Thursday, 20 October 2022

दिवाळी च्या आधीचा दिवस वसुबारस म्हणजे नक्की काय?

 



दिवाळी किंवा दीपावली म्हणजे दिव्यांची रांग. या ओळीमधला एके एक दिवा हा आपला आयुष्य प्रकाशमय करीत जातो. या ओळीतला पहिला दिवा म्हणजे वसुबारस अथवा गोवत्स द्वादशी. या दिवशी कृषिप्रधान समाजात गाई आणि वासराची पूजा केली जाते. 


काही व्यापारी समाज या दिवासाला 'वाघ बारस' साजरे करतात या वाघ म्हणजे टायगर नाही तर कर्ज किंवा थकबाकी आहे. दिवाळी खरंतर भारतात पारंपारिक आर्थिक वर्ष (फायनांशीयल इयर) आहे जे ब्रिटिश राजवटीच्या आधी प्रचलित होते आणि त्यावेळी महाराष्ट्रात शक कॅलेंडर (पंचांग) व्यवहारात वापरले जायचे. 


वसुबारस/वाघबारस या दिवशी आपली सगळी थकीत देणी देऊन खाती बंद केली जायचे (Book closure), पुढचे पाच दिवस व्यापारी देवाण घेवाण बंद राहून नवीन वर्षाचा पहिल्या दिवशी म्हणजे बलिप्रदीपदा(पाडवा) नवीन खातेवही बनवली जायची आणि परत देवाण घेवाण सुरु केली जायची. आता या दोन्ही गोष्टी मार्च एंडिंग ला केल्या जातात त्यामुळे दिवाळीत फक्त सांकेतिक पद्धतीने आपण साजरे करतो. 


पाडव्याचे वहीपूजन आजही मोठा प्रमाणात  केले जाते पण वसुबारस ला आपले देणे देऊन मग दिवाळी साजरी करण्याची आर्थिक शिस्त हरवली आहे. पण हि प्रथा आपल्या  कुटुंबामध्ये चालू राहावी यासाठी आग्रही राहिले पाहिजे, आर्थिक शिस्तीमधून समृद्धी येते नाकी महागडे फटाके फोडून.  


माझ्या मते ता दिवसाचा मूळ गाभा आहे तो हा कि दिवाळी साजरी करण्याआधी आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करणे.  आपण सुट्टी घेत असू तर सुट्टी वर जाण्यापूर्वी आपली कामे पूर्ण करणे किंवा त्याचे योग्य नियोजन करून देणे. आपल्या गाई आणि म्हशी ज्या उत्पन्न मिळवून देतात त्यांच्याकडे आधी लक्ष देऊन मग पुढचा दिवाळी सण साजरा करणे.   


आणि थोडे दिवाळी च्या मागची पार्श्वभूमी समजून घ्यायचा प्रयत्न केला तर लक्षात येते कि इतर सनातन सण जसे निसर्ग चक्र वर अवलंबून आहेत तसाच दिवाळी पण आहे, खरीप पिकाची विक्री झाली कि येणाऱ्या कमाईने आर्थिक चक्र चालू होते. आलेल्या रकामातेउन सगळ्यात आधी काय करायचे तर ते आपण जी इतरांची देणी लागतो ते द्यावे. 


यालाच आजच्या काळात आपण Financial prudence असे गोंडस नावाने ओळखतो आणि त्यासाठी एक्स्पर्ट लोकांकडून सल्ले घेतो. पण आपल्या पूर्वजांनी किती सहज पद्धतीने सण साजरे करण्यातून लाख मोलाचे ज्ञान जोपासले आहे. आपण पण तो वारसा चालू ठेवला पाहिजे. 


बाकी राम अयोध्येला आला म्हणून आपण दिवाळी सण साजरा करतो वगैरे आपण म्हणून मोकळे होतो पण यातून आपण आपल्या संस्कृतीला फारच वर वर समजून घेतो अस मला वाटते. जर आपण मूळ अर्थ समजून न घेता सण साजरे केले तर ज्या गोष्टीसाठी ते आहेत ती गोष्ट विसरून फक्त त्यांची पार्टी करणे एव्हढी ओळख पुढच्या पिढी मध्ये जाईल. 


सगळ्यांना दिवाळीचा शुभेछया आणि  आपली दिवाळी मंगलमय आणि भरभराटीची होऊद्या. या विषयावर आपल्या काही कंमेंट्स असतील तरी नक्की  करा.                                                               

 पहा दिवाळीबद्दल एक मस्त गाणं  Din Din Diwali Song

No comments:

Post a Comment

Pulkeshan

 saral hruday mahatva , ahankari, utsrinhal tha upkara and  sankat ke samay bachane aate apaman ka badala suchana dete samarpan karane ki ha...