आपल्याला नरकासुराची गोष्ट माहितच आहे, या दिवशी नरकासुराचा वध श्रीकृष्णाने केला. मी तो पुन्हा सांगत बसत नाही तर यागोष्टीच्या मागे लपलेली तत्वे जी आपली दिवाळी अधिक आनंदि आणि आरोग्यदायी करू शकतात त्याच्याबद्दल बोलणार आहे.
जरी धनत्रयोदशी हि दिवाळीचा पहिला दिवस असला तरी, लहानपणापासून मला नरकचतुर्दशी हाच पहिला दिवस वाटायचा कारण होते त्या दिवशी पहाटे उठून उटन लावून तेलाने होणारे मालिश आणि त्यानंतर मोती साबणानाने घासून होणारी अंघोळ. लहानपणी घरात सगळ्यात आधी मी अंघोळ करायचो आणि सगळ्यात आधी फटका वाजवायचा अशी स्पर्धा आळीतल्या सगळया मुलांत असायची.
आपलयाला जीवंतपणी पण कधी कधी नरकात जगायाला लागत असत, त्याचे कारण असू शकते अज्ञान, चिंता, दारिद्र्य किंवा निरोगी नसलेले शरीर किंवा मन.
नरकयातना या शब्दाचा अर्थ जेनी त्या भोगल्या आहेत त्यांना लगेच समजू शकतो. ज्यांच्या वाटेला त्या आल्या नाहीत त्यांनी त्या कधी भविष्यात पण येऊ नयेत अशी प्रार्थना.
नरकचतुर्दशीला याच नरकासुराला आपल्या आयुष्यातून बाहेर काढून येणारे नवीन वर्ष सुखात आणि निरोगी जावे म्हणून अभ्यंग स्नानाचा उपयोग होतो. यातील काही महत्वाचे फायदे बघूया.
१. आरोग्य - शारीवरचा मळ निघून जातो. शरीराची होणारी मालिश रक्ताभिसरण वाढवते आणि स्नायू पण लवचिक बनतात यातून आपल्याला नवीन ऊर्जा मिळते. त्वचा लुकलुकत स्वच्छ आणि हिवाळ्याबरोबर लढायला तयार होते.
२. मन - आपल्या मनावर पण बरीच काजळी जमा झालेली असते, चिंता, पच्छाताप अशा बऱ्याच गोष्टी मानसिक त्रासाला कारणीभूत ठरतात. मनाला सुदधा अंघोळ घातली जाते, पहाटेची वेळ आपण अंधारातून प्रकाशाकडे जात असताना अंधार दूर होतो. अंघोळीनंतर नवीन कपडे घातली जातात यातून जुन्या हॉष्टी मागे सोडून परत नव्याने सुरुवात करायची प्रेरणा येते.
दिवाळी बद्दल बोलताना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतांत
"मी अविवेकाची काजळी
फेडूनि विवेकदीप उजळी
तैं योगियां पाहे दिवाळी निरंतर..."
यात अंधार म्हणजे अज्ञान आहे आणि त्याची काजळी काढून विवेकाकडे घेऊन आयुष्य सुदृढ करणारी दिवाळी आहे. नरकचतुर्दशीला दिवाळीची पहिली अंघोळ, छोटी दिवाळी अशा नावाने पण संबोधले जाते. आमच्याकडे पहिली अंघोळ कधी? हे सगळ्यात जास्त ऐकायला मिळणारे वाक्य आहे.
दिवाळी हि नेहमीच भरभराटीच्या येते असे नाही, बऱ्याचदा जशे कि या वर्षी पावसाने भरपूर नुकसान झाल्यामुले शेतकरी व्यथीत आहे. त्यामुळे हि दिवाळी त्यांना जल्लोषाने साजरी नाही करता येणार. यावेळी गरज आहे प्राथर्नेची जेणेकरून या अपयशाने खचून न जाता परत रब्बीची पेरणी जोमाने करून प्रयत्न करन्याची ऊर्जा मिळेल.
सूर्योदयाच्या आधी अंघोळ कर नाहीतर नरकात जाशील, हे आई नेहमी बोलायची पण असा काही नसत असा माझा पूर्ण विश्वास होता. पण असा का बार बोलत असतील? या प्रश्नाचे उत्तर शोधात असताना थोडा शोध घेऊन मिळालेली माहिती हि आहे कि हा दिवस आहे पार्थना आणि आरोग्याचा.
तुम्हाला जर हि पोस्ट उपयोगी वाटली तर आपल्या मित्रांबरोबर आणि कुटुंबाबरोबर जरूर शेअर करा. 👍👍👍
तुम्हाला या दिवाळीत सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभो हि शुभेच्छा. 💥
No comments:
Post a Comment