Showing posts with label दिवाळी. Show all posts
Showing posts with label दिवाळी. Show all posts

Sunday, 23 October 2022

नरकचतुर्दशीला सूर्योदयाच्या आधी अंघोळ नाही केली तर नरकात जातो का?

 



आपल्याला नरकासुराची गोष्ट माहितच आहे, या दिवशी नरकासुराचा वध श्रीकृष्णाने केला.  मी तो पुन्हा सांगत बसत नाही तर यागोष्टीच्या मागे लपलेली तत्वे जी आपली दिवाळी अधिक आनंदि आणि आरोग्यदायी करू शकतात त्याच्याबद्दल बोलणार आहे. 


जरी धनत्रयोदशी हि दिवाळीचा पहिला दिवस असला तरी, लहानपणापासून मला नरकचतुर्दशी हाच पहिला दिवस वाटायचा कारण होते त्या दिवशी पहाटे उठून उटन लावून तेलाने होणारे मालिश आणि त्यानंतर मोती साबणानाने घासून होणारी अंघोळ. लहानपणी घरात सगळ्यात आधी मी अंघोळ करायचो आणि सगळ्यात आधी फटका वाजवायचा अशी स्पर्धा आळीतल्या सगळया मुलांत असायची. 


आपलयाला जीवंतपणी पण कधी कधी नरकात जगायाला लागत असत, त्याचे कारण असू शकते अज्ञान, चिंता, दारिद्र्य किंवा निरोगी नसलेले शरीर किंवा मन. 

नरकयातना या शब्दाचा अर्थ जेनी त्या भोगल्या आहेत त्यांना लगेच समजू शकतो. ज्यांच्या वाटेला त्या आल्या नाहीत त्यांनी त्या कधी भविष्यात पण येऊ नयेत अशी प्रार्थना. 


नरकचतुर्दशीला याच नरकासुराला आपल्या आयुष्यातून बाहेर काढून येणारे नवीन वर्ष सुखात आणि निरोगी जावे म्हणून अभ्यंग स्नानाचा उपयोग होतो. यातील काही महत्वाचे फायदे बघूया. 


१. आरोग्य - शारीवरचा मळ निघून जातो.  शरीराची होणारी मालिश रक्ताभिसरण वाढवते आणि स्नायू पण लवचिक बनतात यातून आपल्याला नवीन ऊर्जा मिळते. त्वचा लुकलुकत स्वच्छ आणि हिवाळ्याबरोबर लढायला तयार होते. 


२. मन - आपल्या मनावर पण बरीच काजळी जमा झालेली असते, चिंता, पच्छाताप अशा बऱ्याच गोष्टी मानसिक त्रासाला कारणीभूत ठरतात. मनाला सुदधा अंघोळ घातली जाते, पहाटेची वेळ आपण अंधारातून प्रकाशाकडे जात असताना अंधार दूर होतो. अंघोळीनंतर नवीन कपडे घातली जातात यातून जुन्या हॉष्टी मागे सोडून परत नव्याने सुरुवात करायची प्रेरणा येते.    


दिवाळी बद्दल बोलताना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतांत 


"मी अविवेकाची काजळी 

फेडूनि विवेकदीप उजळी 

तैं योगियां पाहे दिवाळी  निरंतर..."


यात अंधार म्हणजे अज्ञान आहे आणि त्याची काजळी काढून विवेकाकडे घेऊन आयुष्य सुदृढ करणारी दिवाळी आहे.  नरकचतुर्दशीला दिवाळीची पहिली अंघोळ, छोटी दिवाळी अशा नावाने पण संबोधले जाते. आमच्याकडे पहिली अंघोळ कधी? हे सगळ्यात जास्त ऐकायला मिळणारे वाक्य आहे. 


दिवाळी हि नेहमीच भरभराटीच्या येते असे नाही, बऱ्याचदा जशे कि या वर्षी पावसाने भरपूर नुकसान झाल्यामुले शेतकरी व्यथीत आहे. त्यामुळे हि दिवाळी त्यांना जल्लोषाने साजरी नाही करता येणार. यावेळी गरज आहे प्राथर्नेची जेणेकरून या अपयशाने खचून न जाता  परत रब्बीची पेरणी जोमाने करून प्रयत्न करन्याची ऊर्जा मिळेल. 


सूर्योदयाच्या आधी अंघोळ कर नाहीतर नरकात जाशील, हे आई नेहमी बोलायची पण असा काही नसत असा माझा पूर्ण विश्वास होता. पण असा का बार बोलत असतील? या प्रश्नाचे उत्तर शोधात असताना थोडा शोध घेऊन मिळालेली माहिती हि आहे कि हा दिवस आहे पार्थना आणि आरोग्याचा.  


तुम्हाला जर हि पोस्ट उपयोगी वाटली तर आपल्या मित्रांबरोबर आणि कुटुंबाबरोबर जरूर शेअर करा. 👍👍👍

तुम्हाला या दिवाळीत  सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभो हि शुभेच्छा. 💥







Thursday, 20 October 2022

दिवाळी च्या आधीचा दिवस वसुबारस म्हणजे नक्की काय?

 



दिवाळी किंवा दीपावली म्हणजे दिव्यांची रांग. या ओळीमधला एके एक दिवा हा आपला आयुष्य प्रकाशमय करीत जातो. या ओळीतला पहिला दिवा म्हणजे वसुबारस अथवा गोवत्स द्वादशी. या दिवशी कृषिप्रधान समाजात गाई आणि वासराची पूजा केली जाते. 


काही व्यापारी समाज या दिवासाला 'वाघ बारस' साजरे करतात या वाघ म्हणजे टायगर नाही तर कर्ज किंवा थकबाकी आहे. दिवाळी खरंतर भारतात पारंपारिक आर्थिक वर्ष (फायनांशीयल इयर) आहे जे ब्रिटिश राजवटीच्या आधी प्रचलित होते आणि त्यावेळी महाराष्ट्रात शक कॅलेंडर (पंचांग) व्यवहारात वापरले जायचे. 


वसुबारस/वाघबारस या दिवशी आपली सगळी थकीत देणी देऊन खाती बंद केली जायचे (Book closure), पुढचे पाच दिवस व्यापारी देवाण घेवाण बंद राहून नवीन वर्षाचा पहिल्या दिवशी म्हणजे बलिप्रदीपदा(पाडवा) नवीन खातेवही बनवली जायची आणि परत देवाण घेवाण सुरु केली जायची. आता या दोन्ही गोष्टी मार्च एंडिंग ला केल्या जातात त्यामुळे दिवाळीत फक्त सांकेतिक पद्धतीने आपण साजरे करतो. 


पाडव्याचे वहीपूजन आजही मोठा प्रमाणात  केले जाते पण वसुबारस ला आपले देणे देऊन मग दिवाळी साजरी करण्याची आर्थिक शिस्त हरवली आहे. पण हि प्रथा आपल्या  कुटुंबामध्ये चालू राहावी यासाठी आग्रही राहिले पाहिजे, आर्थिक शिस्तीमधून समृद्धी येते नाकी महागडे फटाके फोडून.  


माझ्या मते ता दिवसाचा मूळ गाभा आहे तो हा कि दिवाळी साजरी करण्याआधी आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करणे.  आपण सुट्टी घेत असू तर सुट्टी वर जाण्यापूर्वी आपली कामे पूर्ण करणे किंवा त्याचे योग्य नियोजन करून देणे. आपल्या गाई आणि म्हशी ज्या उत्पन्न मिळवून देतात त्यांच्याकडे आधी लक्ष देऊन मग पुढचा दिवाळी सण साजरा करणे.   


आणि थोडे दिवाळी च्या मागची पार्श्वभूमी समजून घ्यायचा प्रयत्न केला तर लक्षात येते कि इतर सनातन सण जसे निसर्ग चक्र वर अवलंबून आहेत तसाच दिवाळी पण आहे, खरीप पिकाची विक्री झाली कि येणाऱ्या कमाईने आर्थिक चक्र चालू होते. आलेल्या रकामातेउन सगळ्यात आधी काय करायचे तर ते आपण जी इतरांची देणी लागतो ते द्यावे. 


यालाच आजच्या काळात आपण Financial prudence असे गोंडस नावाने ओळखतो आणि त्यासाठी एक्स्पर्ट लोकांकडून सल्ले घेतो. पण आपल्या पूर्वजांनी किती सहज पद्धतीने सण साजरे करण्यातून लाख मोलाचे ज्ञान जोपासले आहे. आपण पण तो वारसा चालू ठेवला पाहिजे. 


बाकी राम अयोध्येला आला म्हणून आपण दिवाळी सण साजरा करतो वगैरे आपण म्हणून मोकळे होतो पण यातून आपण आपल्या संस्कृतीला फारच वर वर समजून घेतो अस मला वाटते. जर आपण मूळ अर्थ समजून न घेता सण साजरे केले तर ज्या गोष्टीसाठी ते आहेत ती गोष्ट विसरून फक्त त्यांची पार्टी करणे एव्हढी ओळख पुढच्या पिढी मध्ये जाईल. 


सगळ्यांना दिवाळीचा शुभेछया आणि  आपली दिवाळी मंगलमय आणि भरभराटीची होऊद्या. या विषयावर आपल्या काही कंमेंट्स असतील तरी नक्की  करा.                                                               

 पहा दिवाळीबद्दल एक मस्त गाणं  Din Din Diwali Song

Pulkeshan

 saral hruday mahatva , ahankari, utsrinhal tha upkara and  sankat ke samay bachane aate apaman ka badala suchana dete samarpan karane ki ha...